- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना
- भारत १ बाद ९८ धावा
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने नुकताच इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला होता. आता ऑस्ट्रेलियालाही हरवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना आणि स्नेह राणा खेळपट्टीवर आहेत. श्रेफाली वर्मा ४० बाद झाली. स्म्रिती मंधाना ४३ तर स्नेह राणा ४ धावांवर खेळत होती.
ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. फोबी लिचफिल्ड एकही चेंडू न खेळता धावबाद झाली. सुरुवातीला, ताहलिया मॅकग्राच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने ७७.४ षटकांत २१९ धावा केल्या. मॅकग्राने ५६ चेंडूत ५० धावा केल्या आणि पाहुण्यांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरले. दरम्यान, बेथ मुनी (४०) आणि ॲलिसा हिली (३८) ने महत्त्वपूर्ण योगदान दिले. घरच्या संघाच्या गोलंदाजीमध्ये पूजा वस्त्राकरने चार, स्नेह राणाने तीन आणि दीप्ती शर्माने दोन बळी घेतले.
रीचा घोषचे कसोटीत पदार्पण
रीचा घोष भारतीय महिला कसोटी संघात स्थान देण्यात आले. सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार हरमण कौरने तिला कसोटी सामन्याची टोपी देऊन संघात समावेश केला.



