New year celebration: ३१ डिसेंबर बंदोबस्ताकरिता मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस सज्ज

 


दारू पिवून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार

भाईंदर :  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागतासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर ३१ डिसेंबर रात्री जल्लोष साजरा करीत असतात. त्याकरीता बरेच नागरिक रात्री उशीरा रस्त्यावर येत असल्याने मीरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली बंदोबस्त व नाकाबंदी करण्यात येणार आहे

सर्व पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात स्थानिक ३ पोलीस उप आयुक्त, ७ सहा पोलीस आयुक्त, २०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व ५०० पेक्षा अंमलदार, २ दंगा नियंत्रण पथके, होमगार्ड व ४०० मसुब कर्मचारी यांचा योग्य तो बंदोबस्त संबंधित पोलीस उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख ठेवली जाणार आहे.

तसेच ३१ डिसेंबर रोजी रात्री बरेच नागरिक दारू पिवून गाडी चालवित असतात तसेच वाहतुकीचे नियाकडे दुर्लक्ष करीत असतात त्याकरीता वाहतूक विभागाचे १ पोलीस उप आयुक्त, १ सहा. पोलीस आयुक्त, १४ पोलीस अधिकारी, १९२ पोलीस अंमलदार व २४८ ट्रॅफिक वार्डन यांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे.  मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडील वाहतूक शाखेकडे एकूण १५ Breath Analyzer उपलब्ध असून आयुक्तालयात ५० पेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली एकूण ५ पोलीस उपआयुक्त, १० सहा. पोलीस आयुक्त, २२५ पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व ७०० पेक्षा जास्त पोलीस अंमलदार, २४८ ट्रफिक वार्डन व ४०० मसुबचे कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

तसेच नागरिकांना काही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ नजीकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस आयुक्तालयाचे नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ०२२-३५००६१३०, २९४५२१३५ व ७०२१९९५३५२ या क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post