मुंबई, : मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर केली आहे.
६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी मागणी केली होती. आता या मागणीला यश आले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही सुट्टी देण्यात आली असल्याचे शासकीय परिपत्रकात सांगण्यात आले आहे. हा आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे.
सरकारने परिपत्रक काढून म्हटले आहे की, १८ सप्टेंबर १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी दिवशी व २००७ पासून गोपाळकाळा (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्स सरकारी व निमसरकारी कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी देण्यात येत आहेत.
६ डिसेंबर या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर (Chaityabhumi) अभिवादन करणे शक्य व्हावे, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारे पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. आता सततच्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या मार्गांवर अजवड वाहनांना बंदी
- ए. एस.व्ही. माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन.
- एल.जे. रोड माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन.
- गोखले रोड - गडकरी जंक्शन ते धनमिल नाका.
- सेनापताई बापट रोड-माहीम रेल्वे स्टेशन ते वडाचा नाका
- टिळक पूल दादर टीटी सर्कल ते वीर कोतवाल उद्यान,एन.सी. केळकर रोड.
खालील रस्ते राहणार बंद -
- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग वाहतुकीकरीता बंद राहील.
- हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील.
- एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी श्री सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील.
- पोतृगीज चर्च जंक्शन येथून श्री सिद्धीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.
- संपूर्ण रानडे रोड हा वाहतूकीकरीता बंद.
- ज्ञानेश्वर मंदिर रस्ता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.
- संभेकर महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
- केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर बंद राहील.