मुंबई, (ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत): नुकत्याच पुणे बालेवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील पुढील नमुद जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुले: १) प्रसाद सालप १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक
२)देवांश अमुला १ सुवर्ण पदक ३) जीत चव्हाण १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक आणि सांघिक विजेतेपद.
१७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात जश पारीख याने ३ सुवर्ण पदके आणि ३ रौप्य पदकांसह महाराष्ट्राचा अष्टपैलू चॅम्पियन म्हणून उदयास आला. तसेच १४ वर्षांखालील मुली: १) अलिशा चौधरी १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक २) मुग्धा मोरे १ सुवर्ण पदक ३) टियाना क्रास्टो १ सुवर्ण पदक ४) अवंति भावे हिने द्वितीय स्थान प्राप्त करत २ रौप्य आणि १ कांस्य मिळवत सांघिक विजेतेपद सुद्धा पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात ४ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची अष्टपैलू चॅम्पियन बनत उर्वी परबच्या १ सुवर्ण पदका सोबत सांघिक विजेतेपद पटकाविले.
मुलांमध्ये जीत, प्रसाद, जश तसेच मुलींमध्ये अवंति, अलिशा अणि अनुष्का हे दिल्लीत होणाऱ्या स्कूल नॅशनलमध्ये सहभागी होणार आहे.
अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख), मुलांचे प्रशिक्षक शैलेंद्र लाड, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शुभम गिरी व मुलींचे प्रशिक्षक विशाल लोखंडे आणि वंदीता रावल हे सर्व जिम्नॅस्टना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.