लखनऊ: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) लखनऊने कॅट २०२३ (CAT 2023) निकाल जाहीर केला आहे. सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल IIM CAT च्या अधिकृत साइट iimcat.ac.in वर उपलब्ध आहे. या परीक्षेत ३.२८ लाख पात्र उमेदवारांपैकी, अंदाजे २.८८ लाख उमेदवार सहभागी झाले होते, ज्यामध्ये १४ उमेदवारांनी परिपूर्ण १०० टक्के गुण मिळविले आहेत. या परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांची उपस्थिती ८८ टक्के होती. यावेळी अभियंता शाखेतील उमेदवारांनी अव्वल पदांवर वर्चस्व राखले आहे. १०० टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांच्या गटात ११ उमेदवार अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आणि ३ नॉन-इंजिनीअरिंग विभागातील आहेत. या परीक्षेत ३६ % महिला उमेदवार, ६४% पुरुष उमेदवार आणि ५ उमेदवार ट्रान्सजेंडर श्रेणीतून होते.
एकूण १४ उमेदवार आहेत ज्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले आहे. त्यातील २९ उमेदवारांनी ९.९९ टक्के गुण मिळवले आहेत आणि २९ इतर उमेदवार आहेत ज्यांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत. मात्र, या ७२ उमेदवारांमध्ये एकच महिला उमेदवार असून उर्वरित सर्व पुरुष उमेदवार आहेत. कॅट परीक्षेत कोणत्याही महिला उमेदवाराला १०० टक्के गुण मिळवता आलेले नसल्याची ही सहावी वेळ आहे.
यावेळी अभियंत्यांनी अव्वल पदांवर वर्चस्व राखले आहे. १०० टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांच्या गटात ११ उमेदवार अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आणि ३ नॉन-इंजिनीअरिंगचे आहेत.
त्याचप्रमाणे, ९९.९९ पर्सेंटाइलर्सपैकी २२ उमेदवार अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत आणि ७ गैर-अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. ९९.९८ पर्सेंटाइलर्सपैकी २० उमेदवार अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत आणि केवळ ९ गैर-अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. गेल्या वर्षी १०० ते ९९.९८ टक्के गुण मिळवणाऱ्या ५५ टॉपर्सच्या यादीत चार महिला उमेदवार होत्या. २०२१ मध्ये, या वर्गात एक महिला होती.
.jpeg)
.jpeg)