कल्याण आधारवाडी जेलमध्येही एफएम रेडीओ केंद्र सुरू

 

कारागृहातील बंदी सिध्देश पांचाळ बनला रेडीओ जॉकी

कल्याण ( शंकर जाधव )  :  कल्याण जिल्हा कारागृहातही (आधारवाडी जेल) जेल प्रशासनातर्फे मुंबई परिसर विपश्यना केंद्राच्या सहकार्याने एफएम रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (कारागृह आणि सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांच्या मुलाखतीने कल्याण जेलमधील या एफएम केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कल्याण जेल अधीक्षक आर. आर. भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जे.ए. काळे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिदिली.एफएम रेडीओ कक्षामध्ये कारागृहातील बंदी सिध्देश पांचाळ यांनी रेडीओ जॉकीची भुमिका पार पाडली.यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह,  कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इत्यादी कारागृहामध्ये एफएम रेडीओ सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत.


थोडासा विरुंगळा म्हणून आणि कैद्यांना सकारात्मकतेकडे नेण्याकरीता कारागृहात एफएम रेडीओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. एफएम रेडीओ कक्षामध्ये कारागृहातील बंदी सिध्देश पांचाळ यांनी रेडीओ जॉकी बनला. उद्घाटनप्रसंगी कारागृहातील बंदी पांचळ यांनी अमिताभ गुप्ता यांची रेडीओ एफएमवर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा आणि सोईसुविधेबाबत चर्चा केली. त्यावेळी अमिताभ गुप्ता कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लघन होऊ नये हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन बंद्यांना नियमानुसार देण्यात आलेल्या व्हिडीओ कॉल, कॉईनबॉक्स, मनीऑर्डर मर्यादेमध्ये करण्यात आलेली वाढ आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच कैद्यांच्या पुर्नवसनाकरीता नियमानुसार भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

कल्याण जेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या एफएम रेडीओच्या माध्यमातून कैद्यांच्या आरोग्याकरीता घ्यायच्या काळजीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रम, मनोरंजनाकरीता मनपसंद गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपुर्ण महाराष्ट्र कारागृह विभागात सुरू संगणकीकरणातंर्गत कल्याण कारागृहामध्ये किऑस्क मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनच्या माध्यमातून कैद्यांना त्यांच्या केसची पुढील तारीख, त्यांच्या बँक खात्यावरील जमा रक्कम, मुलाखतीबाबतच्या नोंदी आदी माहिती एका क्लीकमध्ये उपलब्ध होणार आहे. या मशीनचेही अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post