शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख मोरे यांची विनंती
डोंबिवली ( शंकर जाधव ) : श्री क्षेत्र आयोध्या धाम येथे श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी होणार असुन आपल्या हिंदु धर्म संस्कृती प्रमाणे संपुर्ण देशभर घरोघर मोठ्या आनंदात उत्सव साजरा करण्यात येत आहे.
धार्मिक कार्य असल्यामुळे कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मटन, चिकन,मच्छी, चायनीज, मासंहार हॉटेल व धाबे तसेच देशी व विदेशी मद्य (दारु) विक्री हे व्यवसाय सोमवारी बंद ठेऊन श्री क्षेत्र आयोध्या येथील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास व हिंदु संस्कृती उत्सवास सहकार्य म्हणून कल्याण- डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात अशा व्यवसायकांना व्यवसाय बंद ठेवण्याची आदेश द्या अशी विनंती शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांना केली आहे.
