राजूनगर व गरीबाचा वाडा रस्ता कॉंक्रीटीकरण नाही, नागरिकांना पाणी नाही..
डोंबिवली ( शंकर जाधव ) : केंद्रात भाजप आणि राज्यात युती सत्ता असतानाहि भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागात विकास कामे होत नसल्याने वैतागून भाजपचे माजी नगसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे यांनी राजीनाम्याचे पत्र डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांच्याकडे दिला आहे.
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पद आणि अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील नागरिकांचेकाम व विकास कामे करणारे विकास म्हात्रे यांनी दिलेल्या राजीनामामुळे शहरात चर्चा सुरु झाली आहे. विकास म्हात्रे यांनी २०१५ नंतर भाजपात प्रवेश केला होता. २०१५ साली पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गरीबाचा वाडा येथून तर त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे या राजुनगर प्रभागातून निवडून आले.२०२० साली प्रशासकीय राजवट लागल्याने प्रभागातील विकास कामे व समस्यांसाठी पालिका आयुक्त व अधिकारी वर्गान पत्रव्यवहार केले. राजुनगर व गरीबाचा वाडा या प्रभागाचा अपुरऱ्या निधीमुळे समस्या सुटल्या नाहीत.
म्हात्रे यांनी अनेक वेळेला प्रशासननाकडे वारंवार पत्रव्यवहार केले होते. मात्र प्रशासनाने पत्राकडे लक्ष दिले नाही.प्रभागातील अनेक रस्त्यांची कामे अपुरी असल्याने व पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडल्याने नागरीक पुरते वैतागले आहेत. इतर प्रभागात विकास कामे होत असताना या दोन प्रभागात कामे का होत नाही अस प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
या दोन्ही प्रभागात एकही रस्ता कॉंक्रीटीकरण झाला नाही. तसेच अनियमित पाणी पुरवठाबाबत वारंवर पत्रव्यवहार करूनही संबधित विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मी पडत आहोत का ? असा प्रश्नही म्हात्रे यांनी राजीनामा पत्रात उपस्थित केला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व कविता म्हात्रे यांनी भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, म्हात्रे यांनी जरी राजीनामा पत्र माझ्याकडे दिला असला तरी तो आम्ही स्वीकारला नाही. त्यांचे जे म्हणणे आहे त्याबद्दल वरिष्ठ नेतेमंडळीशी बोलणार आहे.
