डोंबिवली (शंकर जाधव ) : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्टेशन सल्लागार समितीची व्याप्ती आणि कार्यासाठी रेल्वेच्या मंडल कार्यालय, वाणिज्य शाखा, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचे व्यवस्थापक जितेंद्र चंद्रदेव यादव यांनी मुंबई विभागाची स्टेशन सल्लागार समिती ठाकुर्ली स्टेशन सदस्यपदी भाजपचे पूर्व मंडल उपाध्यक्ष राजू हसन शेख यांची नियुक्ती केली आहे.
रेल्वे कार्यालय माध्यमातून राजू हसन शेख यांना नुकतेच नियुक्तीपत्र मिळाले आहे. तसेच सामान्य सार्वजनिक हिताचा किंवा सार्वजनिक सोयीचा किंवा तसा कोणताही विषय प्रवासी सेवा आणि सुविधांवर परिणाम करणाऱ्या बाबी स्टेशन आपल्याकडून माहीत होतील असेही पत्रात नमूद केले आहे. भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष असून महाराष्ट्र शासनाने या पूर्वी दोन वेळा विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक केली होती.