AUS vs WI TEST : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर एतिहासिक विजय

  • २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विजय
  • जोसेफची प्लेअर ऑफ द सिरीज’ आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड
गाबा : शामर जोसेफच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने गाबा येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. कॅरेबियन संघाने २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विजयाची चव चाखली आहे. वेस्ट इंडिजने कांगारूंच्या भूमीवर शेवटचा विजय १९९७ मध्ये मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी सामन्यात पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोर मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. जोसेफला त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे एकाच वेळी दोन पुरस्कार मिळाले. त्याची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कने मारलेल्या यॉर्करमुळे शमर जोसेफचा अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे शमलला डाव अर्धवट सोडावा लागला होता.
शमर जोसेफ चौथ्या दिवशी गोलंदाजी करू शकणार की नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, हा २४ वर्षीय शामर जोसेफने चौथ्या डावात दुखत असतानाही ११.५. षटके टाकली. शामरच्या हातातून बाहेर पडलेल्या ७१ चेंडूंनी कांगारूंची फलंदाजी उद्ध्वस्त केली. कॅरेबियन गोलंदाजाने कॅमेरून ग्रीन आणि ट्रॅव्हिस हेडला सलग दोन चेंडूत बाद केले. यानंतर जोसेफने मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स आणि नंतर जोश हेजलवूड यांची शिकार करताना ७ विकेट्स घेतल्या.

कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकला होता. यानंतर संघाने दुसरा सामना ८ धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या. यानंतर संघ दुसऱ्या डावात १९३ धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ विकेट गमावून २८९ धावा करून घोषित केला. यानंतर संघाला दुसऱ्या डावात केवळ २०७ धावा करता आल्या. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला.

जोसेफला त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे एकाच वेळी दोन पुरस्कार मिळाले. त्याची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post