डोंबिवली ( शंकर जाधव ) : पै फ्रेंड्स लायब्ररी, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका , डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, )डोंबिवलीकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेकडील ह भ प क्रीडा संकुल येथील बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनात डॉ. योगेश जोशी आणि हेमंत नेहते यांचे समन्वयातून 'पुस्तकांवर बोलू काही' हा उपक्रम पार पडला. त्यात ४० हून अधिक लेखकांनी आपल्या पुस्तकावर आधारित परिक्षणात्मक विचार व्यक्त केले. कथा, कविता, ललित, आत्मकथन अशा विविध साहित्य प्रकारांवर लेखकांनी आपल्या पुस्तकांची जन्मकथा, प्रेरणा, स्वरूप, मांडणी यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वास कुळकर्णी म्हणाले, समाजमाध्यामांचे वाचन संस्कृतीवर झालेले अतिक्रमण रोखण्यासाठी वाचन आदान प्रदान सारखे आणि 'पुस्तकांवर बोलू काही' या सारखे उपक्रम आवश्यक आहे. हे उपक्रम सातत्याने होत राहिले पाहिजे.उमा आवटे पुजारी यांनी कार्यक्रमात लेखकांच्या पुस्तकविषयक सादरीकरणाविषयी सांगितले. ललिता छेडा यांनी आपल्या भाषणात कथालेखन, ललित लेखनविषयक मार्गदर्शन करून परीक्षण कसे लिहावे व सादर करावे याबाबत माहिती दिली.
याप्रसंगी मुकुल गरे यांची पुस्तकावर आधारित मुलाखत सादर करण्यात आली.पै फ्रेडस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी पुस्तक आदान प्रदान उपक्रमाची भूमिका सांगितली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ.योगेश जोशी यांनी सांभाळली.कविता आदान प्रदान या कार्यक्रमासाठी दीपाली काळे, रागिणी उपासनी , रिटाबेन शहा हेमंत नेहते, आदी मान्यवर उपस्थित होते.