पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजाप चित्रपट कामगार आघाडी डोंबिवली शहर कार्यकारणी आणि डोंबिवली जिमखाना मॉर्निंग वॉक /योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली जिमखाना रोड एसटी बस स्टँड येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विनोद कोरे यांनी रात्रभर बसून श्री प्रभू रामाची भव्य रांगोळी काढली.
या निमित्त संध्याकाळी श्रीराम मूर्ती पूजा,सगळ्यांनी पणत्या लावून पुर्णे रांगोळी प्रकाश मान केली, दोन्ही ग्रुप मिळून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.
फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर अल्पोपहार घेऊन समारंभाची सांगता झाली. या वेळी दोन्ही ग्रुपचे सभासद, बस प्रवासी मोठ्या उत्साहाने हजर होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रदीप पाटील, कुमुद आहीरे, संदीप नलावडे, रमेश जुईकर व इतर सभासद तसेच भाजापा चित्रपट कामगार आघाडी डोंबिवली शहर अध्यक्षा शर्मिला केसरकर आणि सहकारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात अरविंद सुर्वे भाजाप चित्रपट कामगार आघाडी डोंबिवली शहर यांचे संकल्पनेतून साजरा करण्यात आला.