२७ जानेवारीला सिंधुदुर्ग, पुणे, मुंबईतील नाभिकांची स्नेहभेट सभा



मुंबई, :  सिंधुदुर्गातील, मुंबई, पुणे शहरात रहाणार्‍या, नाभिक समाज बांधवांची एकमेकांना ओळख व्हावी. सहकार्य मिळावे, नाभिक समाजाचा उत्कर्ष व्हावा. समाजाची एकजूट वाढावी, मुलांचा शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा. म्हणुन स्नेह भेट कार्यक्रम २७ जानेवारी २०२४ रोजी दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. 
      या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य नाभिक मंडळाचे मुख्य संघटक विजय सि. चव्हाण, महाराष्ट्र नाभिक समाजाचे जेष्ठ सल्लागार दत्तात्रय चव्हाण, महाराष्ट्र सलुन असोशिएशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण, असोशिएशनचे माजी अध्यक्ष व सोंग्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिपक यादव, नाभिक महिलांचे नेतृत्व सोनाली चव्हाण उपस्थित रहाणार असल्याने, सिंधुदुर्गच्या नाभिक समाजातील मुंबईत रहाणार्‍या सर्व क्षेत्रातील बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे संपर्कप्रमुख पत्रकार गणेश चव्हाण यांनी केले आहे.
   
    गेली दीडशे वर्ष, मुंबई पुण्यामध्ये सिंधुदुर्गातील हजारो नाभिक बांधव नोकरी धंद्या निमित्त वास्तव करत आहेत. प्रत्येक नाभिक बांधव आपापल्या संसारात गुंतलेला आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपला संसार चालवण्यासाठी, प्रत्येकाची धडपड सुरू आहे. या धावपळीत त्यांना आपलाच समाज बांधव आपल्या विभागात राहतो. त्याची भेट घ्यावी, त्याला सहकार्य करावे किंवा त्यांचे सहकार्य आपण घ्यावे अशा भावना असून सुद्धा धावपळीमुळे शक्य होत नाही. सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे संपर्कप्रमुख पत्रकार गणेश चव्हाण यांनी, गेली ३० वर्ष याचा अभ्यास करून गेल्या वर्षभर, सर्व नागरिक बांधवांना एक एक असे करून एकत्र केले. आणि मुंबई व पुणे येथील सुमारे ५०० कुटुंब, फोन व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने एकत्र बांधली. या ५०० कुटुंबातील चाकरमान्यांचा स्नेहभेट कार्यक्रम शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३-३० वा. श्रीकृष्ण मंगल कार्यालय (हाॅल) नायगांव, दादर मुंबई येथे आयोजित केला आहे. 
     यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई व पुण्यात राहणाऱ्या सर्व बांधवांनी स्नेहभेट कार्यक्रमांला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार गणेश चव्हाण यांनी केले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधवांनी आपले मुंबई - पुण्यात असलेल्या समाज बांधवांना ही माहिती फोनद्वारे कळवावी, अधिक माहितीसाठी ९४२००८४१२५ वर चव्हाण यांना संपर्क करावा. असे आवाहनही सिंधुदुर्गातील नाभिक बांधवांना, गणेश चव्हाण यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post