Lok Sabha Election 2024: आप पंजाबमध्ये एकट्याने लढणार


ममता बॅनर्जी पाठोपाठ आपने देखील कॉंग्रेसचा हात सोडला

चंदीगड:  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी (mamta banerji)  यांनी बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान  यांनीही पंजाब निवडणुकीत काँग्रेससोबत युती न करण्याचे संकेत दिले आहेत.

 काँग्रेससोबतच्या युतीबाबत मुख्यमंत्री मान यांनी पंजाबमध्ये आम्ही युतीसोबत जाणार नसून एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत पंजाबमधील १३ जागांवर लढताना आम आदमी पक्षाचे वर्चस्व चांगले होते, त्यामुळेच आम आदमी पक्षाची बाजू १३-० अशी होती. आगामी काळात पंजाब राज्यात काँग्रेस आणि आप यांच्यात युती होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

 पंजाब काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जालंधरच्या काँग्रेस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत युती करण्याला विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युती न करता एकट्याने निवडणूक लढविण्यावर जोर देणार असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post