रांची: जमीन घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने बुधवारी संध्याकाळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. जमीन घोटाळ्यातील सोरेन हे १५ वे आरोपी आहेत. यापूर्वी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे दहा समन्स, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समन्सकडे सातत्याने होणारी अवहेलना, ईडीच्या चौकशीत समाधानकारक उत्तर न मिळणे हे त्यांच्या अटकेचे कारण ठरले. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापेमारी दरम्यान जप्त करण्यात आलेली ३६ लाख रुपये आणि बीएमडब्ल्यू कार याविषयी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न मिळाल्यानंतरच ईडीने त्यांना अटक केली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले १५ वे आरोपी आहेत. यापूर्वी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने २० जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांची चौकशी केली होती आणि अद्याप चौकशी पूर्ण झाली नसून आणखी एक दिवस चौकशी केली जाईल, असे सांगितले होते.
याआधई ईडीने सोरेन यांना २७ जानेवारी ते३१ जानेवारी दरम्यान चौकशीची तारीख आणि ठिकाण सांगण्यास सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ईडीला उत्तर पाठवले की, आपण सध्या व्यस्त आहोत, चौकशीची तारीख आणि ठिकाण लवकरच सांगू. त्यावर ईडीने मुख्यमंत्र्यांना कडक पत्र लिहून २९ किंवा३१ तारखेला चौकशीसाठी वेळ द्यावा, अन्यथा ईडी स्वतःप्रमाणे चौकशीचा निर्णय घेईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले. ईडीला २८ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि मुख्यमंत्री दिल्लीत असल्याची माहिती ईडीला मिळाली, तेव्हा या माहितीवरून ईडीने २९ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थान आणि झारखंड भवनावर छापे टाकले. मुख्यमंत्री सापडले नाहीत, मात्र त्यांच्या निवासस्थानातून ३६ लाख रुपये, बीएमडब्ल्यू कार आणि जमीन घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. ईडीने ती जप्त केली.
दरम्यान सीएमओकडून ईडीच्या रांची कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले होते की मुख्यमंत्री ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दुपारी १ वा. चौकशीसाठी उपस्थित राहतील. सीएमओच्या या पत्राच्या आधारे ईडीची टीम ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि आठ तास चौकशीनंतर त्यांना अटक केली.