डोंबिवलीकरांचे मत
डोंबिवली ( शंकर जाधव ) : 'सरकारी काम आणि चार महिने थांब' असे न होता शासनाच्या सर्व योजना एका छताखाली आणून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रम सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना सरकारी कार्यालयात कामासाठी अनेक दिवस लागू नये म्हणून या उपक्रमाला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे या उपक्रमाप्रमाणे तात्काळ होणे आवश्यक आहे असे माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी व्यक्त केले.तर सरकारी कार्यालयाच्या हेलपाटेपेक्षा 'शासन आपल्या दारी' उपक्रम उत्तम असल्याचे डोंबिवलीकरांनी मत व्यक्त केले.
उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड सेवा, आधार कार्ड सेवा, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना,प्रधानमंत्री मातुत्व योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्यान भारत कार्ड /आभा कार्ड, दिव्यांग कल्याणकारी योजनाव साहित्य वाटप, महिला व बालकल्याण विभागातील योजना, ज्येष्ठ नागरिक दाखला, रहिवासी / स्थानिक वास्तव्याचा दाखला, बांधकाम कामगार योजना व अनेक योजना एकाच छताखाली 'शासन आपल्या दारी' उपक्रमात देण्यात आल्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगर येथील आनंदीबाई पाटील वाडीमधील रवी पाटील मैदान येथे आयोजित उपक्रमात माजी नगरसेवक तथा शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक नितीन पाटील, माजी नगसेविका रंजना पाटील, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक रवी पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.