लिंग परिवर्तनानंतर ललितकुमार साळवेंना पुत्ररत्न

 

बीड : माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी असलेले ललितकुमार साळवे लिंग परिवर्तन केल्यानंतर एका मुलाचे पप्पा झाले आहेत. १५ जानेवारीला त्यांना मुलगा झाला.

२०२० मध्ये लग्न केलेल्या ललिता साळवे यांना २०१३ रोजी त्यांच्या शरीरात काही बदल दिसले आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्यात Y गुणसूत्र असल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक, पुरुषामध्ये X आणि Y गुणसूत्र असतात, तर स्त्रियांमध्ये दोन X गुणसूत्र असतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी साळवे यांना जेंडर डिसफोरिया असल्याचे सांगून लिंग पुनर्नियुक्ती शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २०१८ मध्ये राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर साळवे यांच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या काळात २०१८ ते २०२० पर्यंत त्याच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सामान्य जीवन जगण्यासाठी साळवे यांनी २०२० मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील महिलेशी लग्न केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना साळवे म्हणाले, "स्त्री होण्यापासून ते पुरुष होण्याचा माझा प्रवास खूप खडतर होता. या काळात मला अनेकांची साथ मिळण्याचे भाग्य लाभले. लग्नानंतर माझ्या पत्नीला मूल व्हावे, अशी इच्छा होती ती आता पूर्ण झाले."

जून १९८८ मध्ये जन्मलेल्या, ललितकुमार साळवे यांनी मी आता बाप झालो याचा मला आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर  माझ्या कुटुंबातही आनंदाची लाट आहे. ललितला लिंग बदलण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. त्यादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतर ललितला लिंग बदल करण्यास मान्यता मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post