डोंबिवली (शंकर जाधव ) : बंजार समाज सामाजिक संस्था डोंबिवलीच्या वतीने जगद्गुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रिक्षाला झेंडे साउंड लाऊन ५७ रिक्षा , वाहनेव ८० कार्यकर्ते याच्यासह सकाळी १० ते दुपारी १२ रॅली काढण्यात आली.तसेच संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ व मान्यवरांच्या हस्ते दिप पुजन व भोग लाऊन आरती करण्यात आली. यावेळी १२०० हुन अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डेपुटी कलेक्टर जयराम पवार, विभागीय उपयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ठाणे प्रदीप पवार, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, नंदुभाऊ पवार, उप तालुकाप्रमुख उमेश पाटील, उप शहर प्रमुख अमित बनसोडे, माजी उप संरपच विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, मारुती राठोड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष सुदाम जाधव, कार्याध्यक्ष विलास राठोड, उप अध्यक्ष संभाजी राठोड, खजिनदार ज्ञानेश्वर राठोड, सचिव बसराज चव्हाण, उपाध्यक्ष रवी जाधव, विजय राठोड, संघटक अंकुश राठोड, पुंडलिक तवर देविदास राठोड, तात्यासाहेब पवार, दिलीप राठोड व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.