नवी दिल्ली: भारतीय सिनेसृष्टीतील दंगल फेम सुहानी भटनागर या अभिनेत्रीच निधन झाल्याची घटना घडली आहे. १९ वर्षीय सुहानीचा अपघात झाला होता त्यावर उपचार सुरू असताना गोळ्यांच्या साइडइफेक्टमुळे तिच्या शरीरात पाणी मोठ्या प्रमाणात भरल्याने निधन झाल्याचे समोर आले आहे.
फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या सुहानी भटनागरचा मागील काही दिवसात अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणामामुळे तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागले होते. यामुळे तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुहानी भटनागरने दंगल चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने ज्युनियर बबिता फोगटची भूमिका साकारली होती.