महिला पोलिसांसह नागरिकांचा सहभाग
डोंबिवली ( शंकर जाधव ) : जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवलीत 'मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी' मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत महिला पोलिसांनी मराठी भाषेतून स्वाक्षरी केली.
डोंबिवली रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांनीही मराठी भाषेतून स्वाक्षरी केली. यावेळी मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत यासह मनसैनिक उपस्थित होते.यावेळी शहरअध्यक्ष कामत म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा. या मोहिमेत डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर नागरिकांनी मराठी भाषेतून स्वाक्षरी केली.