आर्यमाने इंग्लिश स्कूलचा मराठी राज्यभाषा दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

 

दिवा, /  (आरती मुळीक परब) : मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने आर्यमाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा काल दिव्यातील साबेगावामधील विठ्ठल मंदिराच्या सभागृह साजरा झाला. कळवा, मनीषा नगर आणि दिवा येथील तीन शाळेच्या विद्यार्थ्यांचा सोहळा एकत्रपणे पार पडला.

सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुर्वात गणेश वंदनेने झाली. शाळेच्या चिमुकल्या मुला- मुलींच्या नृत्य गायनाने उपस्थित पालक वर्ग अवाक झाले. शाळेतल्या सर्व शिक्षकांनी या लहान मुलांकडून नाच गाण्याची सुंदर प्रॅक्टिस केल्याचे दिसुन आले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेल्या मुलाने राष्ट्रीय एकात्मतेचा, जाती धर्माचा संदेश दिला. एका मुलीने कीर्तनाच्या माध्यमातून बाराखडीचा अनोखा अर्थ समजावून सांगितला. तर ज्युनिअर के.जी, सिनियर के.जी.ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गणेशनृत्य, देविचा जागर, कोळी नृत्य, भांगडा, गरबा, साऊथ इंडियन डान्स करून उपस्थित पालकांची मने जिंकली. शाळेच्या डान्स टीचरने बाबा व मुलाच्या प्रेमाचे नृत्य सादर केले. कळवा शाळेच्या महिला पालकाने एक सुंदर नृत्य सदर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास स्थानिक समाजसेविका अर्चना पाटील, नगरसेवक अमर पाटील, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शाळेच्या संस्थापिका प्रगती आर्यमाने, उपाध्यक्ष प्रकाश जोशी, संचालक संजय आर्यमाने, मुख्याध्यापक धनराज आर्यमाने, स्थानिक नगरसेवक यांच्यासह ज्युनिअर के. जी, सिनियर के.जी आणि पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post