शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने हळदी- कुंकू समारंभ उत्साहात संपन्न.
दिवा, (आरती मुळीक परब) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्र. २७ च्या वतीने दिवा शहरात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "होय मीच होणार दिव्याची होम मिनिस्टर" व हळदी- कुंकू समारंभाला दिव्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमामध्ये दिव्याची होम मिनिस्टर म्हणून मानाची पैठणी राजश्री आयवळे यांनी पटकावली. तसेच रुपाली खवणेकर सोन्याची नथ व शिल्पा कदम या चांदीच्या पैजणीच्या मानकरी ठरल्या. लकी ड्रॉ स्पर्धेच्या विजेत्या सोना मोनी ठरल्या. त्यावेळी इतरही अनेक आकर्षक बक्षिसे महिलांकरिता ठेवण्यात आली होती.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रत्नमाला सुभाष भोईर, नगरसेविका नंदिनी राजन विचारे, कल्याण लोकसभा संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका कविता गावंड, मेघना सुमित भोईर तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा सहसंपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, प्रकाश तेलगोटे, कुणाल ढापरे, दिवा शहरसंघटक रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका (दिवा शहर) योगिता नाईक, महिला शहर संघटिका ज्योती पाटील आदी मान्यवर लाभले होते.
तसेच कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, युवा अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख तेजस पोरजी यांच्या माध्यमातून नगरसेविका अंकिता पाटील, महिला विभाग संघटिका मयुरी पोरजी, तृप्ती पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास उपशहर संघटिका प्रियांका सावंत, विभाग संघटिका स्मिता जाधव, विनया कदम, नीलम पाटील, मीनाक्षी लाड, निकिता भोईर तसेच सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, युवासेना व महिला आघाडी यांच्या सहकार्याने केले.