आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

 उल्हासनगर : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात जमिनीच्या वादातून भाजपच्या एका आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यावर गोळी झाडली. पोलिसांनी सांगितले की, अटकेनंतर आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर २ जणांना उल्हासनगरच्या दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील जमिनीच्या वादावरून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदाराने शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यावर गोळी झाडली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, अटकेनंतर आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर २ जणांना उल्हासनगरच्या दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी माझे लाखो रुपये खाल्ले. मला मनस्ताप झाला म्हणूनच मी फायरिंग केली. गोळ्या झाडल्याचा मला काहीही पश्चाताप नाही. माझ्या मुलाला पोलिसांच्या समोर मारत असतील तर मी काय करणार? असा सवाल करत पोलिसांनी डेअरिंग करून मला पकडले त्यामुळे तो वाचला. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब करायला घेतले आहे. शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रभर पाळले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post