विनोद कुमावतवर बलात्काराचा आरोप

 

नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

 नाशिक  : खान्देशी गाण्यांवर सगळ्यांना ठेका धरण्यात भाग पाडणारे विनोद कुमावतवर बलात्काराचा आरोप एका महिलेने केला आहे. विनोदच ‘हाय झुमका वाली पोर’ हे गाण सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. विनोद कुमावत'मने यू ट्यूब चॅनलवर (Youtube) प्रदर्शित होणाऱ्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेने नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

अभिनेता विनोद कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, या पीडित महिलेने त्याच्याकडे त्याच्या पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता, तिला शिवीगाळ करून मारहाण देखील केल्याचे या पीडितेने म्हटले आहे. तसेच तिला लग्नाचे वाचन देऊन देऊन देखील त्याने नंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोद कुमावत याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद कुमावत हा सातपूरमधील म्हाडा कॉलनीत राहण्यास आहे. पीडितासोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून अजून विनोदवर कोणतीही कारवाई करण्या आलेली नाही. दरम्यान, नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. 'हाय झुमका वाली पोरं' हे अहिराणी भाषेतील गाणे सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिंग आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेता विनोद कुमावत देखील लोकप्रिय झाला होता. ‘हाय झुमका वाली पोर’ या गाण्याची निर्मिती देखील विनोद कुमावत याने केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post