डोंबिवली ( शंकर जाधव ) : अराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा हितवर्धक मंडळ, डोंबिवलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक सजावटीने नटलेल्या रथासह भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरीआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.रॅली मराठा हितवर्धक मंडळ सभागृह डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड वरून सुरुवात करुन उमेश नगर, सम्राट चौक, दीनदयाळ रस्त्याने कोपर पुलावरून डोंबिवली पूर्व टंडन रोड, चार रस्ता टिळक चौक, फडके पथ करत मानपाडा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यत काढण्यात आली. प्रभात फेरीत मंडळाचे सभासद, पदाधिकारी आपल्या अबाल वृद्ध कुटुंबीयांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.