दत्ता माळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना अन्नदान

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मराठवाडा, विदर्भ सेवा संस्था कल्यान डोंबिवली, - अध्यक्ष, डोंबिवली रिक्षा संघटना (भाजप प्रणित ) कोषाध्यक्ष, शिवराणा मित्र मंडळ (डोंबिवली ) अध्यक्ष, भाजपा वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी वाढदिवसानिमित्त डोंबिवली जवळील हेदुटणे येथील संचालिका अक्षदा भोसले यांच्या अंकुर बाल विकास केंद्र येथील बालकांना अन्नदान केले. यावेळी माळेकर यांच्यासह सह परिवार आणि रिक्षा चालक यांसह मुलांसोबत दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला. मुलांनी सादर केलेल्या सास्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.

 या वेळेस दत्ता माळेकर म्हणाले, की या मुलांसोबत आज वाढदिवस साजरा करून मला फार बर वाटले समाजातील प्रत्येक घटकाने अशाच प्रकारच काम करून अनाथ, असाह्य, गरीब मुलांच्या शिक्षनाची जबाबदारी घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला पाहिजे.यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर पगारे यांनी सुरेख गीत सादर केल्यानंतर बालकांनी टाळ्या कडकडाडात जल्लोष केला.



Post a Comment

Previous Post Next Post