Weather Updates: बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यात पावसाचा इशारा

  • हिमाचलपासून काश्मीरपर्यंत बर्फवृष्टी वाढली
  • वेस्टर्न डिस्टर्बन्सचा फटका महाराष्ट्राला बसणार

नवी दिल्ली: दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी काही भागात रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे तापमान कमी झाल्याने थंडी वाढली असली तरी त्याचा फायदा रब्बी पिकांना होणार असून येत्या एक-दोन दिवसांत काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मध्य प्रदेशातील हवामानात बदल झाला. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या. हिमाचलमधील काही जिल्ह्यांमध्ये हिमवृष्टी, वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे पर्यटनस्थथळांची प्रसिध्दी वाढली आहे.  श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीवर बर्फ साचल्याने सर्व उड्डाणे रद्द करावी लागली. माँ वैष्णो देवी भवन आणि बेस कॅम्प कटरा येथे दिवसभर हलक्या पावसामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. 

उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये चार फूट बर्फवृष्टी झाली. याशिवाय बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तुंगनाथ, औली, हेमकुंड साहिब, हरसिल, मुन्सियारी यासह उच्च उंचीच्या भागात बर्फवृष्टी झाली. केदारनाथचे तापमान उणे १७ अंशांवर कायम आहे. गोपेश्वर-चोपटा-उखीमठ महामार्ग, बद्रीनाथ महामार्ग आणि औली रोड बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आले आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील रतापानी ते पातलथोडपर्यंत बर्फवृष्टीमुळे थल-मुन्सियारी रस्ता बंद  करण्यात आला असून येथे मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडल्याचे चित्र आहे.

पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी सकाळी धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारपासून हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊसही पडला. बिहारमधील १८ शहरांमध्ये हलका पाऊस, विजांचा कडकडाट आणि गडगडाटाचा इशारा देण्यात आला आहे.


वेस्टर्न डिस्टर्बन्सचा फटका महाराष्ट्राला बसणार

 पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून तापमानात चार ते पाच डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढणार आहे. उत्तर भारतात देखील थंडीची लाट कायम असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी कायम राहणार आहे. पाच तारखेनंतर किमान तापमान जवळजवळ चार डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. तसेच पाच तारखेनंतर आकाश निरभ्र राहणार आहे. उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात चार डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील दोन दिवस तापमान कमीच राहणार आहे. तर, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादला पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच हलके धुके पडण्याची शक्यता आहे. तापमानत अंदाजे चार डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे. पाच, सहा व सात फेब्रुवारीला कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.



Post a Comment

Previous Post Next Post