डोंबिवली ( शंकर जाधव ) : पार्किग केलेली मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकून गजाआड केले आहे.हे दोघे मु.पो. इब्राहिमपुर, ता. गदद्दीपुर जि.आझमगड, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली परिसरातुन १) कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी.( ३८, रा. त्रिमुर्तीनगर झोपडपटट्टी, रूम नं. ५, शेलारनाका, डोंबिवली – पूर्व ) २) विक्रम उदय चौहान ( ४८, रा. त्रिमुर्तीनगर झोपडपट्टी , शेलारनाका, डोंबिवली –पूर्व ) पोलिसांनी अटक केली. ३१ तारखेला पूर्वेकडून सुशांत शशिकांत पालकर यांची मोटारसायकल कं. MH-06/BH - 8986 ही चोरीस गेली होती. पालकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना १ जानेवारी रोजी पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहा.पो.निरी. संदिप चव्हाण व पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
अटक केलेल्या दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.यातील कैलाश सुभाष जोशीवर कल्याण तालुका पोलीस ठाणे व मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे पंजाबराव उगले,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.नि.राहुल मस्के, सहा. पो.नि.संतोष उगलमुगले, सहा.पो.नि.संदिप चव्हाण, पो.हवा अनुप कामत, पो.हवा.दत्ताराम भोसले, पो.हवा.बालाजी शिद,पो.हवा.विलास कडु, चालक पो.हवा.अमोल बोरकर, पो.ना. सचिन वानखेडे, पो.शि. विजेंद्र नवसारे, पो.शि. विनोद चन्ने यांनी केली आहे.