डोंबिवली ( शंकर जाधव ) : महराष्ट्र नवनिमार्ण सेना महिला पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्वेकडील रामनगर येथील स्वामी समर्थ मठाच्यालगत हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता.
यावेळी (mns) मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या पत्नी योगिता पाटील, डोंबिवली महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील, सरोज भोईर, ज्योती मराठे, दीपिका पेंढणेकर,सुमेधा थत्ते, प्रमिला पाटील, स्मिता भणगे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रभागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते.या खेळांमध्ये महिलांना विशेष बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हळदीकुंकू निमित्त महिलांना सौभाग्यवाण देण्यात आले.