डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिका 'फ' प्रभागक्षेत्र शिवमार्केट प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक तथा माजी शिक्षण मंडळ सभापती विश्वदीप पवार आणि महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी श्रध्दा विश्वदीप पवार यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. सदर हळदी कुंकू समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते.
या खेळांमध्ये महिलांना विशेष बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.हळदीकुंकू निमित्त महिलांना सौभाग्यवाण देण्यात आले. यावेळी लहान मुलांसाठी काही खेळ आयोजित केले होते. लहान मुलांनी याचा आनंद घेतला. गेली अनेक वर्ष हळदीकुंकू कार्यक्रम होत असून महिला या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माधुरी भिडे, धरती गाडा, वंदना गोडबोले, हेमलता संत, अपर्णा, सायली, अश्विनी खंडागळे, अनघा पवार, दिवे यांनी विशेष मेहनत घेतली.