मुंबई/ (सचिन कुळ्ये) : फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) हे भारतातील आघाडीचे एड-टेक व्यासपीठ ठाणे, अंधेरी आणि कल्याण येथे तीन तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन विद्यापीठ केंद्रांच्या लाँचसह मुंबईमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. यामधून संपूर्ण भारतात एज्युकेशनल हब्स स्थापित करण्याप्रती, तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याप्रती व्यासपीठाची कटिबद्धता दिसून येते.
तसेच फिजिक्सवाला ४ फेब्रुवारी रोजी योगी सभागृह हॉल, स्वामी नारायण मंदिराजवळ, रेल्वे स्टेशनसमोर, दादर पूर्व येथे 'आगाज' नावांतर्गत भव्य इव्हेण्टचे देखील आयोजन करणार आहे. या इव्हेण्टमध्ये पालकांसोबत उपस्थित असणाऱ्या आणि जेईई व नीट परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांना समुपदेशन करण्यात येईल. आगामी शैक्षणिक वर्षातील नोंदणीसाठी इव्हेण्टच्या दिवशीच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त २५ टक्के सूट देण्यात येईल. याव्यतिरिक्त, पीडब्ल्यूचे अव्वल शिक्षक जसे मनिष राज, सचिन जाखर, डॉली शर्मा, राजवंत कुमार सिंग, अमित कुमार महाजन देखील उपस्थित असणार आहेत. या तीन केंद्रांव्यतिरिक्त पीडब्ल्यूची सध्या महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे आणि नागपूर येथे पाच ऑफलाइन केंद्रे आहेत.
पीडब्ल्यू ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंकित गुप्ता म्हणाले, ''प्रत्येक ऑफलाइन केंद्राच्या लाँचसह आम्ही संपूर्ण भारतात शैक्षणिक हब्स स्थापित करण्याच्या, तसेच दर्जेदार शिक्षण अधिक उपलब्ध करून देण्याच्या आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाच्या जवळ पोहोचत आहोत. ही केंद्रे देशातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सज्ज आहेत.''
पीडब्ल्यूने संपूर्ण भारतात ७५ तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ केंद्रे सुरू केली आहेत आणि १.५ लाख विद्यार्थ्यांना सेवा देण्यासह जवळपास दोन वर्षांमध्ये तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑफलाइन नेटवर्कसह झपाट्याने विकसित होणारी एडटेक कंपनी म्हणून उदयास येत आहे. ही केंद्रे जेईई/नीटसाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रम देतात.
पीडब्ल्यू ऑफलाइन विद्यापीठ केंद्रे रेकॉर्ड केलेले लेक्चर्स, एनसीईआरटी मटेरिअल्ससह साह्य, ऑफलाइन शंका निराकरण, डेअली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स (डीपीपी) सह व्हिडिओ सोल्यूशन्स, विशेषीकृत मॉड्यूल्स आणि प्रीव्हीयस इअर क्वेशन्स (पीवायक्यू) अशा सर्वोत्तम सुविधा देतात. या केंद्रांमध्ये स्टुडण्ट सक्सेस टीम (एसएसटी) साठी समर्पित डेस्क देखील आहे, ज्यामुळे पीडब्ल्यू एकमेव कंपनी आहे, जी विद्यार्थ्यांना समस्यांसंदर्भात जलद व वैयक्तिक उपाय देते. तसेच, पालक-शिक्षक डॅशबोर्ड सिस्टम देखील आहे, जी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत रिअल-टाइम अपडेट्स देते.