WPL : मुंबई इंडियंसची विजयी सुरुवात

दिल्लीचा चार गडी राखून पराभव 

महिला प्रीमियर लीग (WPL 2024) च्या उद्घाटन सामन्यात मुंबईने दिल्लीचा ४ गडी राखून पराभव करत विजयाने सुरुवात केली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईला विजयासाठी ५ धावांची गरज असताना २० व्या अंतिम षटकांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून एस संजनाने संघाला विजय मिळवून दिला.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि बंगळूर यांच्यात खेळला गेला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात खराब आणि खूपच संथ गतीने सुरुवात केली. ॲलिस कॅप्सीने ७५ धावांची शानदार खेळी केली. यानंतर कॅप्टन लॅनिंगने ३१ धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने ४२ धावा आणि मारिझान कॅपने १६ धावा करत संघाची धावसंख्या ५ बाद १७१ अशी केली.

 १७१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने शानदार फलंदाजी केली. सलामीची फलंदाज यास्तिका भाटियाने चमकदार कामगिरी केली. तिने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्याचवेळी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ५५ धावा करण्यात यशस्वी ठरली. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ती झेलबाद झाली.  हरमनप्रीतन बाद झाल्यानंतर फलंदाजीला एस संजना आली. केरळच्या या फलंदाजाने २० व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला.

 मुंबईकडून नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. याशिवाय शबनिम इस्माईलला एक विकेट मिळाला.


 

Post a Comment

Previous Post Next Post