कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांचे मत
डोंबिवली ( शंकर जाधव) : आज जरी प्रत्येक जिल्ह्याची निश्चित अशी टक्केवारी नसली तरी पण देशाचा विचार केला तर एक लाख लोकसंख्येमागे ३० कॅन्सर रुग्णांची आकडेवारी आहे. कॅन्सर म्हणजे निश्चित मरण असं समजले जात असेल तर ते काही खर नाही. आता कॅन्सरवर होणाऱ्या उपचारांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नवीन शोध लागलेले आहेत. त्यामुळे कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण वाढल आहे. स्तनांचा कॅन्सर बरं होण्याचे प्रमाण सुमारे ९० टक्क्यांच्यावर पोहचले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे लवकर तपासणी करणं गरजेचं आहे. कर्करोगावर `वेळेत निदान देईल जीवदान` हा मुळमंत्र आहे.
कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर म्हणाले, रशिया कर्करोगावर लस बनवत आहे, त्याबद्दल अनेक प्रश्न आहे की हे नवीन आहे का ? काहीतरी वेगळे आहे का? तर कर्करोगावर लस हे काही नवीन नसून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो, त्यावर लस उपलब्ध आहे.भारतानेही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर लस उपलब्ध करून दिली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक मोठा रोग भारतात हि आढळून आला असून देशात दुसरा क्रमांक स्रियांत आहे.हा कर्करोग सामान्यपणे ४० ते ५० वयोगटातील महिलांना होत असून या वयोगटातील व्यक्तींवर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. त्यातच कर्करोग हा लवकर समजणे आवश्यक असून त्यामुळे लवकर उपचार सुरू होतील.
रुग्णांना उपचारासाठी दूर जावे लागते.आता सरकारने बरीच पाऊले उचलली आहेत.परंतु स्थानिक पातळीवर जेवढ्या लवकर सेंटर होईल तेवढा फायदा होईल. योजनेमार्फत याचा कर्करोगावर उपचार होत असून त्याचा फायदा झाला पाहिजे. सर्वात महत्वाचे असते की कर्करोगावर जनजागृती होणे आवश्यक आहे.आपल्याला रोग होतोय हे माहिती असण सर्वात महत्वाचे आहे. हे माहित नसेल तर काहीच करता येत नाही. स्थानिक पातळीवर प्रथमोपचार केंद्र आहेत, त्यात कर्करोगावर जनजागृती करता आली तर भीती व गैरसमजूती या दूर करता येतील. या रुग्णांना लवकर उपचार घेता येतील व खर्चही कमी होईल.
सामान्यपणे कर्करोग म्हटलं की अवाढव्य खर्च होणार, परिस्थिती वाईट होईल, रोगाने तर मरुच आधी कर्जाने अधिक मृत्यू होईल असे लोकांना वाटते.म्हणून जर जनजागृती झाली आणि लवकर हा रोग समजला तर उपचार पण लवकर होईल. सामान्यपणे कर्करोग झाला तर मृत्यू अटळ असे बोलले जाते पण त्यात तथ्य नाही, कर्करोगावर उपचार पद्धती बदल झाली आहे, त्यामुळे कर्करोगाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून स्तनाचे कर्करोग बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून सर्वात महत्वाचे म्हणजे लवकरात लवकर त्याचे निदान होणे व जनजागृती होणे आवश्यक आहे.