रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेकडून महिलांना शिलाई यंत्राचे वाटप

 

महिलादिनानिमित्त दिव्यातील गरजू महिलांना भेट

दिवा, (आरती मुळीक परब) : रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेतर्फे महिलादिनाचे औचित्य साधून महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होऊन दिव्यातील महिला आर्थिक दृष्ट्‍या सक्षम व्हाव्या हे धेय्य मनात ठेऊन  दिवा शहरातील १० गरजू महिलांना शिलाई यंत्राचे वाटप सेंट मेरी हायस्कूलच्या हॉलमध्ये करण्यात आले.

२०१७ मध्ये स्थापना झालेल्या रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेमार्फत दिव्यात समाजपोयोगी विविध कार्यक्रम गेल्या आठ वर्षात घेतले गेले. तसेच २ ते ३ वर्षांपासून दिव्यातही महिलादिन छान पद्धतीने साजरा होत आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष हर्षद भगत, सचिव आदित्य पाटील, किशोर पाटील, स्वप्निल गायकर, अभिषेक ठाकूर, युवराज बेडेकर, प्रतिक बेडेकर, गणेश टावरे उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post