Ranji Trophy 2024 : मुंबईने ८ वर्षांनी रणजी ट्रॉफी पटकावली

Maharashtra WebNews
0

रहाणेच्या शिलेदारांनी विदर्भाला नमवत जेतेपद 

मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ४२ व्यांदा रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत विदर्भाचा १६९ धावांनी पराभव करून ८ वर्षानंतर रणजी ट्रॉफीच्या  जेतेपदावर आपले नाव कोरले. धवल कुलकर्णीने त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटच्या षटक टाकत १०वी विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईने केलेल्या ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात ३६८ धावांत सर्वबाद झाला.

 अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी करंडक जेतेपदाचा सामना रंगला. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत आटोपला. त्यांच्या दुसऱ्या डावात मुंबईने ४१८ धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी ५३७ धावांची झाली आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात  ३६८ धावांत सर्वबाद झाला. यासह मुंबईने हा सामना १६८  धावांनी जिंकला. मुंबईने रणजीमध्ये ४२वे विजेतेपद पटकावले.

अथर्व तायडे आणि ध्रुव शौरे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ६४ धावांची भागीदारी केली. मात्र, या धावसंख्येवर विदर्भाने दोन्ही विकेट गमावल्या. अथर्व ३२ धावा करून बाद झाला तर ध्रुव २८ धावा करून बाद झाला. यानंतर अमन मोखाडे आणि करुण नायर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी झाली जी मुशीर खानने तोडली. अमन ७८ चेंडूत ३२ धावा करू शकला. संघाला चौथा धक्का यश राठोडच्या रूपाने बसला तो केवळ सात धावा करू शकला.

 करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी पाचव्या दिवशी फलंदाजीला सुरुवात केली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १७३ चेंडूत ९० धावांची भागीदारी झाली. नायर ७४ धावांची दमदार खेळी खेळून बाद झाला तर अक्षय १०२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला तनुष कोटियनने आपला बळी बनवले. अक्षर आणि हर्ष दुबे यांच्यात सहाव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी झाली. हर्षला दुसऱ्या डावात ६५ धावा करता आल्या. यानंतर विदर्भाचा डाव गडगडला. मुंबईविरुद्ध आदित्य सरवटेने तीन, यश ठाकूरने सहा, उमेश यादवने सहा धावा केल्या. तर आदित्य ठाकरे एकही धाव न काढता नाबाद राहिला.

 मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक चार बळी घेतले. तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलाणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 मुंबईचा दुसरा डाव
 पृथ्वी शॉ ११ धावा, भूपेन लालवाणी १८ धावा, अजिंक्य रहाणे ७३ धावा, श्रेयस अय्यर ९५ धावा, हार्दिक तामोर ५ धावा, मुशीर खान १३६ धावा, शार्दुल ठाकूर शून्य, तनुष कोटियन १३ धावा करून बाद झाले.यानंतर अखेर शा. मुलानी ५० धावा केल्या. धावांची नाबाद खेळी खेळली. तर शार्दुल ठाकूरला खातेही उघडता आले नाही. तनुष कोटियनने १३, तुषार देशपांडेने २ धावा केल्या.

 विदर्भाचा पहिला डाव
 शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. आज विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला २३ धावा करता आल्या.
यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पाहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला १९, अक्षयला पाच आणि हर्षला एक धाव करता आली. यानंतर तनुषने तीन गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (२७), यश ठाकूर (१६) आणि उमेश यादव (२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने तीन बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)