घरफोडीचा आरोपी अटक, तीन सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकल्या
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण- डोंबिवली व उल्हासनगर परिसरातील रिक्षा चोरून विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले.या दोघांना पोलिसांनी डोंबिवलीतील टाटा नका येथून अटक केली चोरट्याकडून सात रिक्षा हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.घरफोडी करणारा एकास अटक केली असून तीन सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासीर हुसेन पठान ( ३०, रा. न्यू गोविंदवाडी , कचोरेगाव , कल्याण पूर्व ) व शाहरुख बुडन शहा ( २८, रा,संभाजीनगर, जालना ) असे अटक केलेल्या रिक्षा चोरट्यांची नावे आहेत.मोटर वाहन चोरीच्या वाढत्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना सपोनि व पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे यांनी माहिती मिळवून २८ फेब्रेवारी रोजी दोघांना अटक केली.या दोघांकडून ३,७० हजार रुपये किमतीच्या सात रिक्षा हस्तगत करण्यात असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांनी गुन्हेप्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक बनवून सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरून व माहितीच्या आधारे घरफोडी गुन्ह्यातील आरोपी अफताफ ईशशाद मोमीन ( ३३, नफीस बिल्डींग, हसीन फरान टाकीजवळ, कसाईवाडा, भिवंडी ) येथून अटक केली.अफताफ हा त्याचा साथीदार तैसीफ अन्सारी यांच्याबरोबर केलेल्या चार घरफोडी गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी अटक आरोपीकडून १२ ग्रॅम वजनाचे ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कॉईन, ५२ ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन व रोख रक्कम आठ हजार रुपये आणि १ मोबाईल फोन असे एकूण ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
स्वप्नील हरीश माधवानी उर्फ करकट्या बाबू ( १८, रा. विजयदीप चाळ, जाकीर किराणा स्टोअर्सच्या बाजूला, शांतीनगर झोपडपट्टी, कळवा ), जावेद झाकीर शेख ( २३, एम.एम. चाळ, श्रीलंका मुंब्रा बायपास,मुंब्रा ) आणि इरफान सिद्दिक शेख ( २२, शांतीनगर झोपडपट्टी ,कळवा ) असे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील तीन चोरट्यांची नावे आहेत.२० जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील ज्येष्ठ महिला आपल्या नातू सोबत उसाचा रस पिण्यासाठी उभे असताना या तिघांनी पाठीमागे येऊन त्यांच्या गळ्यातील १,८०,००० रुपये किमतीच्या दोन सोन्याचे हार खेचून पसार झाले. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी अटक केलेल्या तिघा चोरट्यांकडून ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन तुकडे चैन, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे अर्धवट तुटलेली चैन असा एकूण १,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या गुन्हातील आणखी एकाचा पोलीस शोध घेत आहेत.या आरोपींवर टिळकनगर, डोंबिवली, कळवा, चितळसर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवली पूर्वकडील दावडी येथे १,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी भंगारचा धंदा करणारा राहुल नागेश घाडगे ( २५, संजय गांधीनगर झोपडपट्टी, प्रीतम टॅटो दुकानाच्या बाजूला. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ, कल्याण पूर्व ) याला अटक केली.पोलिसांनी त्याच्याकून ५ ग्रॅम वजनाचे एकूण २ सोन्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅम वजनाचे एकूण २ सोन्याचे कानाचे झुमके, रिंग असे एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राहुलवर कल्याण रेल्वे, कोळसेवाडी, बदलापूर पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कामगिरी पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ ३, कल्याण पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विजय कादबाने,पोनि राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड, सपोनि.प्रशांत आंधळे, सपोनि.महेश राळेभात,सपोनि.संपत फडोळ, पोहवा/राजेंद्र खिलारे, पोहवा सोमनाथ टिकेकर,सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा संजु मासाळ, पोहवा विकास माळी, पोहवा शिरीष पाटील, पोहवा दिपक गडगे, पोहवा निसार पिजारी, पोना.गणेश भोईर, पोना. प्रविण किनरे, पोना अनिल घुगे, पोना.शांताराम कसबे, पोना देवा पवार, पोना यलप्पा पाटील, पोना रवि हासे, पोशि नाना चव्हाण, पोशि विजय आव्हाड, पोशि अशोक आहेर, पोशि महेंद्र मंजा यांचे पथकाने केलेली आहे.