रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी सदस्यपदी सारिका शिंदे

  

डोंबिवली ( शंकर जाधव ) : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी सदस्यपदी संपादिका सारिका अमर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोंबिवलीतील शुभम सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्ष माला नाईक यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.

संपादिका शिंदे या गेल्या १५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला यांनी अनेक वृत्तपत्रात लिखाण केले होते. सारिका शिंदे या साप्ताहिक 'आपला भगवा या वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका आहेत. शिंदे या महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृीधारक पत्रकार आहेत. आज पत्रकारिता क्षेत्रासोबताच समाजसेवेची देखील आवड असल्यामुळे त्या नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतात. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनीमध्ये त्यांना समाजसेवा करण्याची संधी मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post