अलिबाग, (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काँग्रेस पक्षाला खिंडार पाडले आहे. काँग्रेसचे नेते आणि खिडकी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य वैभव पाटील यांच्यासह सरपंच आणि सर्व सदस्य यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये प्रवेश केला आहे. खारेपाट विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.
येत्या काळात अलिबाग तालुक्यातील अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष अमित नाईक यांनी सांगितले आहे.
खारेपाट विभागात वैभव पाटील हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते. काही दिवसापासून पक्षीय कार्यापासून ते लांब होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नी खिडकी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.