अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी जयेंद्र भगत

 


अलिबाग, (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी वाडगावचे जयेंद्र भगत यांची निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांचे हस्ते नेमणुक पत्र देण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद झेंडा फडकवित अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदोड राखणारे माजी सरपंच जयेंद्र भगत खासदार सुनिल तटकरे यांचे विश्‍वासू व निष्ठावान कार्यकर्ते अशी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांत नामदार मंत्री आदिती तटकरे व आम. अनिकेत तटकरे यांचे त्यांना नेहमीच सहकार्य मिळते, यामुळे अनेक विकास कामे त्यांनी वाडगाव ग्रामपंचायतीत मार्गी लावली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ओबिसी सेल तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्र्षे जबाबदारीने काम केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष म्हणून पाच वर्षे त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात, तसेच पक्षाच्या आंदोलन व र्मोर्चे आदी कार्यात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. गेले अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचा झेंडा वाडगाव ग्रामपंचायतीवर फडकवित ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यासह त्यांनी कुस्ती क्षेत्रात सुध्दा क्रियाशीलतेने काम केले आहे. अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. त्यांचा जबरदस्त जनसंपर्क व कार्य याची कदर ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसुवा खासदार सुनिल तटकरे यांनी जयेंद्र भगत यांना अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे.

त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड होताच त्यांचे समर्थव व मित्रमंडळी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post