डोंबिवली ( शंकर जाधव ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला उधाण येतानाच डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रवेश केला. शरद पवार गट युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण ग्रामीण सरचिटणीस योगेश डांगे, उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह डोंबिवली भाजप पूर्व मंडल कार्यालयात भाजप नेते शशिकांत कांबळे, नंदकिशोर परब, मुकुंद (विशू) पेडणेकर, सचिन म्हात्रे आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणूक काळात झालेली ही इनकमिंग महत्वाची असून आता अशाच इनकमिंग सुरूच होत राहणार असा विश्वास भाजप नेते व्यक्त करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये समावेश करण्यात भाजप डोंबिवली पूर्व मंडल सरचिटणीस मितेश पेणकर यांचा मोठा वाटा आहे.
भाजप ज्या प्रकारे युवकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासकामे करत आहे, त्यामुळेच नवीन युवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतात असेही एका भाजप पदाधिकाऱ्याने म्हटले. पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी प्रकाश (बाळा) पवार, संजीव बिडवाडकर, सचिन म्हात्रे, रविसिंग ठाकूर, धनाजी पाटील, रामचंद्रजी माने, पूनम पाटील, अथर्व कांबळे, अंकित रयानी, रुपेश पवार, दीपक त्रिपाठी, शरद जैन व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.