दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यातील साबे गाव येथील पालिका शाळेजवळ एक व दातीवली गाव येथील हनुमान मंदिराजवळ एक अशा दोन नवीन आरोग्य केंद्रांच्या कामाचे उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले.
मातोश्री नगर, गणेश पाडा येथील आरोग्य केंद्र व हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांना दिवेकरांचा मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता दिवा शहरात आणखी दोन नवीन आरोग्य केंद्रे सुरु होणार आहेत. त्यामुळे दिवेकरांच्या आरोग्याची परवड आता आणखी कमी होणार. प्रभाग क्रमांक २७ मधील साबे गाव, ठामपा शाळेजवळ नवीन आरोग्य केंद्राच्या कामाचं व प्रभाग क्रमांक २८ मधील दातीवली गावातील हनुमान मंदिराजवळ आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना शहरप्रमुख, उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रभाग क्रमांक २७ येथे शिवसेना माजी नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, उपशहर प्रमुख अँड. आदेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील, अर्चना पाटील गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, उपविभाग प्रमुख, धीरज पाटील, संतोष हळदणकर, शाखाप्रमुख दिगंबर भोईर, महेश पाटील, शैलेश पाटील, अविनाश गुरव, आनंद लाखन, निरंजन चुडनाईक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.