Loksabha election 2024: सात टप्प्यांत होणार निवडणुका


१९ एप्रिलपासून निवडणुकीस प्रारंभ 

०४ जून रोजी अंतिम निकाल

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांनी१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत ५४३ जागांसाठी निवडणुका सात टप्प्यात  होणार असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान१९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासोबतच देशभरात आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, यावेळी संपूर्ण देशात प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या मतदारांना फॉर्म १२डी वितरित केला जाईल. त्यांना मतदान केंद्रावर जायचे नसेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मत नोंदवले जाईल. 

महिला मतदारांना जोडण्याचे कामही आम्ही केले असल्याचे ते म्हणाले. देशात १२ राज्ये अशी आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. यावेळी १८ ते १९ वर्षे वयोगटातील १.८ कोटी मतदारांपैकी ८५ लाख महिला मतदार आहेत. १७ वर्षांवरील १३.४ लाख नवीन मतदारांचे आगाऊ अर्ज आमच्याकडे आले आहेत. हे असे मतदार असतील जे १ एप्रिल रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करतील.

महाराष्ट्रातले मतदान

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

️चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश आहे.





 

Post a Comment

Previous Post Next Post