Wpl 2024 : कोण होणार चॅम्पियन

दिल्ली कॅपिटल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये अंतिम लढत

नवी दिल्ली :  महिला प्रीमियर लीगचा दुसरा सीझन अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज रविवारी (१७ मार्च) या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. RCB प्रथमच या लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे तर दिल्ली कॅपिटल्स सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मानधनाच्या नेतृत्वाखाली संघाने एमआयला पाच धावांनी अविस्मरणीय पराभव दिला. त्याच वेळी दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांत सहा विजय नोंदवले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

गेल्या मोसमात जेतेपदाच्या लढतीत मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली खेळतांना दिल्ली संघाला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दिल्ली आपल्या भूतकाळातील चुकांमधून धडा घेईल आणि अंतिम फेरीत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. 

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.


Post a Comment

Previous Post Next Post