मनसे आमदार राजू पाटील यांचे प्रतिपादन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : पाहिले ही लोक एकत्र लढलेली मात्र त्यात अजून एक गट सामील झाला. लोकसभा तर ट्रेलर हे आहे खरा पिक्चर दिसेल ते विधानसभेत दिसेल.पालिका लेव्हललाही या गोष्टी घडणार त्यावेळेला यांची युतीही असेलच असं सांगता येत नाही असे मनसे नेते प्रमोद ( राजू ) पाटील यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मनसे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या हस्ते मनसैनिकांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तर काहींनी मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार उभा नाही. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनआदेश आले नाही त्यामुळे इथे कोणत्या पक्षाला पाठींबा द्यायचा हे अद्याप ठरले नाही.
पुढे आमदार पाटील म्हणाले, ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. या आमच्या भावना आम्ही राज ठाकरे यांना सांगू.पण आमच्या भावनापेक्षा आमच्या साहेबांच्या आदेश काय आहे हे महत्त्वाचे आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमागे मनसे पक्ष भाजपला पाठींबा देत आहे का अशी चर्चा सुरू होती. या चर्चेबाबत आमदार पाटील म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीत जाणार असे सांगितले नाही. पक्षाची पुढची दिशा काय असेल गुढीपाडव्याचा मेळावा दिसेल.