कल्पना किरतकर यांची माहिती
डोंबिवली ( शंकर जाधव ) : बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपा आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्रपणे निवडणूक लढविली होती. कल्याण लोकसभा निवडणुकीत दयानंद किरतकर यांनी निवडणूक लढविली होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांनी महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना बसपा ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. यात ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदार संघाचाही समावेश असणार आहे. यावेळी ठाणे लोकसभा प्रभारी आयु. मधुकर बनसोडे, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष आयु. रवी बनसोडे आदी उपस्थित होते.