दरेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म दिला. त्यानंतर दरेकर यांना उद्धव ठाकरे यांनी 'विजयीभव' आशीर्वाद दिला.
शुक्रवारी सकाळी मातोश्रीवर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत उमेदवार वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म देण्यात आला.यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दरेकर यासह पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. येत्या ३० तारखेला वैशाली दरेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.