मला साडे सात लाखापेक्षा जास्त मत पडतील - डॉ. श्रीकांत शिंदे



बाळासाहेबांचे विचार विसरून फक्त सत्तेसाठी अडीच वर्षे कारभार केला 

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका  

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   स्व. बाळासाहेबांची विचार विसरून फक्त सत्तेसाठी अडीच वर्षे कारभार केला अशी टीका करत महायुती समोर कोणीही तग धरू शकत नाही. लोकसभेमधील राष्ट्रवदीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भविष्यात ताकद देण्याचे काम आम्ही करू. छाती ठोकपणे लोकांना सांगू शकतो की विकास कामे खूप केली आहे. आपल्याला कल्याण लोकसभेची जागा रेकॉर्ड मतांनी जिंकायची आहे. मला विश्वास वाटतोय की मला साडे सात लाखापेक्षा जास्त मत पडतील असा विश्वास विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष ( अजित पवार) गटाच्या मेळाव्यात व्यक्त केला. 

    कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली या विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार) गटाचा मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादीची ताकद मतदार संघात मोठया प्रमाणात आहे हे मेळाव्यातून दिसत आहे.पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आल्याचे यावेळी डॉ.शिंदे यांनी सांगितले.या मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे , प्रमोद हिंदुराव, रमेश हनुमंते,डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी, कुणाल जोशी, निलेश पाटील, समीर भोईर, ॲड.ब्रम्हा माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, भाजप पदाधिकारी शशिकांत कांबळे, नंदू परब आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले , आम्ही पुन्हा २५ वर्षाच्या युतीबरोबर आलो आणि महाराष्ट्र राज्यात एक वेगळा इतिहास घडविला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) हे तिन्ही पक्ष एकत्र का आलो जे सर्वांना माहीत आहे.त्यानंतर विकासाचे काम सुरू झाली. त्यानंतर अजित पवार हे विकासावर विश्वास ठेवून या सरकार मध्ये सामील झाले. तिन्ही पक्षाचे नेते हार्डवेकिंग नेते आहेत.अगोदर सरकारमध्ये ते सरकार देखील घरी बसल होते आणि इतरांनाही घरी बसवत होते. हे सरकार आल्यापासून तिन्ही पक्षातील नेत्यांनी दिवस रात्र जनतेची कामे करत आहे. 

विरोधकांवर टीका करून वेळ वाया जातो.२०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मी उभा असताना विरोधकांवर टीका केली नव्हती. आता देखील आपलं काम आणि आपल्या सरकारचे काम, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे काम लोकापर्यत घेऊन जायचे आहे. लोकांना एक विश्वास दाखवितो की.आता लोक उन्हाळ्यात गावी जातील तर त्यांना सांगितलं पाहिजे की २० मे रोजी तुम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी यायचं आहे. 




Post a Comment

Previous Post Next Post