गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची नवचैतन्य रॅली

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजु) पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण भागात रविवारी नवचैतन्य रॅली काढण्यात आली.

कल्याण ग्रामीण भागातील प्रिमियर कॉलनी सखाराम शेठ विद्यालय ग्राउंडवरून मनसैनिकांनी मोटारसायकलवरून रॅलीला सुरुवात केली.पुढे कल्याण फाटा या दिशेने मोटरसायकल रॅली कल्याण फाट्यावरून उजवीकडे शीळ कडे जाणारा रस्ता चौकातून उजवीकडे वळत शीळगाव खर्डी मार्गे दिवा शहर चौकातून उजवीकडे आगासन रोड बेतवडे संदप करत लोढा मधून डावीकडे नवनीत नगर शंखेश्वर दिशेने उजवीकडे पुढे कमानी वरुन डावीकडे मानपाडा रोडवरुन सरळ पुन्हा प्रशांत हॉटेल वरून उजवीकडे आईस फॅक्टरी मार्गे सागर्लीवरुन जिमखाना रोड शिवम हॉस्पिटल वरून घरडा सर्कल पेंढारकर रोडवरूनअनंत रीजन्सी वरून प्रीमियर कॉलनी सखाराम Star विद्यालय ग्राउंडवर रॅलीची समाप्ती करण्यात आली.



या रॅलीत कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, अरुण जांभळे,प्रितेश म्हामुणकर,माजी नगरसेविका कोमल पाटील, दिपिका पेंढणेकर, सुमेधा थत्ते, श्रीकांत वॉरंगे,प्रितेश पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post