उत्तराखंड : उत्तराखंडमधील नैनिताल आणि आसपासच्या जंगलात भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हवाई दलाचे Mi-17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या मदतीने पाइन्स परिसरातील आग विझवण्यात आली. मात्र, या आगीत णतण कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
गेल्या २४ तासात राज्यात ३१ ठिकाणी जंगलाला आग लागल्याची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारीही राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागल्यााच्या अनेक घटना घडल्या. अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक निशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राखीव जंगलांमध्ये २९ आणि नागरी किंवा वन पंचायतींमध्ये दोन घटनांची नोंद झाली आहे. एकूण ३३.३४ हेक्टर जंगल या आगीमुळे बाधित झाले आहे.
गढवाल विभागातील टिहरी, पौरी, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यातील जंगले सतत जळत आहेत. बहुतांशी पाइनचे जंगल असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. वन कर्मचारी आग विझवण्यात व्यस्त आहेत. एका ठिकाणी आग विझवली की ती दुसऱ्या ठिकाणी भडकते. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
चमोली जिल्ह्यातील जंगलात पुन्हा आग लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी जंगलाला आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती नष्ट झाली आहे. गोपेश्वरजवळील कोथियालसैन आणि गविल्सच्या जंगलात शुक्रवारी आग लागली. पाइनच्या जंगलात लागलेल्या आगीने अचानक रूप धारण केले. सकाळी इंजिनीअरिंग कॉलेजच्या खाली असलेल्या जंगलात आग लागली. ही आग आयटीबीपी कॅम्पसमधील घोड्याच्या तळ्याजवळ पोहोचली.
कुमाऊँच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत असून शनिवारपासून भीमताल तलावातील पाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जंगलातील विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मेलकाणी म्हणाले की, आतापर्यंत हेलिकॉप्टरने तीन वेळा तलावातून पाणी भरून ते जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वनविभागाचे कर्मचारीही आग विझवण्यात गुंतले असल्याचे मेलकाणी यांनी सांगितले. आगीमुळे भीमताल, पाइन्स, राणीबाग, सत्तल, बेतालघाट आणि रामगड जंगलातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.