सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे काल दोन मे रोजी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार करिता महाड येथे आल्या होत्या. आज सकाळी नऊ वाजता त्यांना पुढील प्रचार दौऱ्यासाठी बारामती येथे जावयाचे होते, याकरिता त्यांनी महालक्ष्मी इव्हिगेशन पुणे यांचे हेलिकॉप्टर निश्चित केले होते.
सकाळी नऊच्या सुमारास हेलिकॉप्टर महाड येथे आले असता खाली उतरत असताना क्रॅश झाले. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टाळला या हेलिकॉप्टरचे पायलट नितीन वेल्डे हे सुरक्षित असून या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनामार्फत चौकशी केली जाण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.